शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीचा राजीनामा द्या, मगच ईव्हीएमविरोधात बोला; मारकडवाडीतील सभेत सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 08:13 IST

मारकडवाडीची माती राहुलजींच्या हाताने बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या चरणी वाहिली जाणार आहे. भारत जोडो यात्रा झाली तशी ही चळवळ आपल्या गावापासून सुरू होईल, असेही पटोले म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनातेपुते (जि. सोलापूर) : मारकडवाडी येथे ईव्हीएमच्या विरोधात भाषणे करून लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारे नेते आणि त्यांच्या घरातील, पक्षातील आमदार, खासदारांनी आधी राजीनामा द्यावा, मगच ईव्हीएमच्या विरोधात बोलावे, असे आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले.

मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, ईव्हीएम हॅक केले ते लाडक्या बहिणी, कष्टकरी शेतकरी, शोषित जनतने आणि ओबीसी मतदारांनी. जनतेनेच ईव्हीएम हॅक करून महायुतीच्या पारड्यात मतांचे दान टाकले. हे आंदोलन मोहिते पाटील व त्यांच्या नेत्यांनी सुरू केले असून, लोकांनी नेहमीच गुलामीत राहावे, असे त्यांना वाटते. यातूनच ईव्हीएमला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. 

राजीनाम्यास तयार ‘बॅलेट’वर मतदानाचे पत्र घ्या : पटोलेसत्ताधाऱ्यांनी बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याचे पत्र निवडणूक आयोगाकडून घ्यावे. माझ्यासहीत येथील आमदार उत्तम जानकर आणि खूप जण राजीनामे देण्यास तयार आहोत, असे प्रतिआव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.मंगळवारी पटोले यांनी मारकडवाडीला भेट देऊन ग्रामस्थांनी संवाद साधला. आपल्या मारकडवाडीची माती राहुलजींच्या हाताने बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या चरणी वाहिली जाणार आहे. भारत जोडो यात्रा झाली तशी ही चळवळ आपल्या गावापासून सुरू होईल, असेही पटोले म्हणाले.

‘पराभवानंतर आंदोलन करता’सदाभाऊ खोत म्हणाले, २००४ साली काँग्रेसने ईव्हीएम भारतात आणली. याच मशीनच्या माध्यमातून दहा वर्षे सरकारचा कारभार केला. आता पराभव झाला की ईव्हीएमच्या नावाने आंदोलन करत आहेत. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एका वर्षाच्या आत जयसिंह मोहिते-पाटील जेलमध्ये दिसतील. शंकर साखर कारखान्यावर सहा महिन्यांत प्रशासकदिसेल, असे राम सातपुते यांनी सांगितले. 

बैलगाडीतून मिरवणूकहेलिकाॅप्टरमधून उतरल्यानंतर बैलगाडीतून आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, माजी आमदार राम सातपुते यांची मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस