शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
4
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
5
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
6
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
7
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
8
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
9
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
10
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
11
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
12
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
13
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
14
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
15
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
16
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
17
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
18
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
19
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
20
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव

"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 12:24 IST

Ramraje Naik Nimbalkar Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर निशाणा साधला. 

Ajit Pawar Ramraje naik nimbalkar News: "रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात सूत्रं दिली. त्यांचा मानसन्मान ठेवला. भाजपची मते घेतली आणि रामराजेंना सभापती केलं. महत्त्वाची खाती दिली. रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे यांचं का पटले नाही माहिती नाही", असे म्हणत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. 

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (महायुती) उमेदवार सचिन कांबळे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा झाली. साखरवाडीत झालेल्या या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेची तोफ डागली. 

अरे मग तुम्ही काय करता? अजित पवारांचा सवाल "आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगत होते की, श्रीराम सहकारी साखर कारखाना, नाव श्रीरामाचं आणि दिलाय चालवायला. अरे कारखाना काढल्यानंतर सात वर्षात कारखान्याचे रिपेमेंट (परतफेड) आम्ही करतो आणि कर्जमुक्त करतो. तुम्ही २५-३० वर्षे चालवायला. अख्खी पिढी... अरे मग तुम्ही काय करता? तुमच्या धमक आणि ताकद नाही?", असा सवाल करत अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केले. 

धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या -अजित पवार

अजित पवार पुढे म्हणाले, "श्रीमंत राजे, तुम्ही उघड उघड त्या दीपकच्या प्रचाराला जावा. मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता. तुम्ही आता तिकडे गेला ना, त्या आमदारकीला लाथ मारा. तुमच्यात खरंच धमक आणि ताकद असेल ना, तुम्ही आमदारकीला लाथ मारून तिकडे (शरद पवारांकडे) जावा, मला काही वाटणार नाही", असे म्हणत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना आव्हान दिले. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर 

अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. पण, त्यानंतर अजित पवारांना धक्का बसला. दीपक चव्हाण शरद पवारांकडे गेले आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. दीपक चव्हाण यांचं काम रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून करत असल्याची चर्चा आहे. त्यावरूनच अजित पवारांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024phaltan-acफलटणAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती