वन खात्यात खांदेपालट! एम. श्रीनिवास राव प्रधान यांची मुख्य वनसंरक्षक पदावर बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:11 IST2025-02-13T08:11:10+5:302025-02-13T08:11:34+5:30

या पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक नाशिक) ऋषिकेश रंजन हे आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन, नागपूर) ही जबाबदारी सांभाळतील

Reshuffle in the Forest Department! M. Srinivas Rao Pradhan transferred to the post of Chief Conservator of Forests | वन खात्यात खांदेपालट! एम. श्रीनिवास राव प्रधान यांची मुख्य वनसंरक्षक पदावर बदली

वन खात्यात खांदेपालट! एम. श्रीनिवास राव प्रधान यांची मुख्य वनसंरक्षक पदावर बदली

मुंबई - राज्याच्या वन खात्यात बुधवारी महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले. एम. श्रीनिवास राव यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर बदली करण्यात आली. आतापर्यंत त्यांच्याकडे उत्पादन व व्यवस्थापन हा विभाग होता. राव यांच्याकडे राज्य निसर्ग पर्यटन मंडळ; नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. 

प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) या पदाची जबाबदारी विवेक खांडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत ते अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर होते. खांडेकर यांच्याकडे प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, पुणे) या पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक नाशिक) ऋषिकेश रंजन हे आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन, नागपूर) ही जबाबदारी सांभाळतील.

इतर झालेल्या बदल्या
ताडोबा, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची बदली चंद्रपूर येथे याच पदावर करण्यात आली. नागपूरचे डॉ. किशोर मानकर हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नवे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक असतील. 
उपसंचालक असलेले प्रभूनाथ शुक्ला यांची बदली ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वनसंरक्षक व क्षेत्र संचालकपदी करण्यात आली. उपवनसंरक्षक (संशोधन) या पदावर पुणे येथे असलेले आशिष ठाकरे हे आता नवे वनसंरक्षक (संशोधन) म्हणून जबाबदारी सांभाळतील. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात महिलाराज
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक व संचालकपदी अनिता पाटील यांची बदली करण्यात आली.  मल्लिकार्जुन जी. यांची बदली नाशिक येथे मुख्य वनसंरक्षक म्हणून नाशिक येथे करण्यात आली आहे.

Web Title: Reshuffle in the Forest Department! M. Srinivas Rao Pradhan transferred to the post of Chief Conservator of Forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.