शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची मर्यादा ७०% करावी; कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 00:46 IST

केंद्र सरकारने कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवून ७० टक्के करावी. मर्यादा वाढविल्याविना मराठा आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र तसा आग्रह धरला पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी म्हटले.

मुंबई : केंद्र सरकारने कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवून ७० टक्के करावी. मर्यादा वाढविल्याविना मराठा आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र तसा आग्रह धरला पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी म्हटले.आरक्षण फक्त ५० टक्के असावे असा उल्लेख संविधानात कुठेच नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयानेच आपल्या अधिकारात आरक्षणावर ५० टक्क्यांची मर्यादा टाकणारा निकाल दिला. तरीही सध्या महाराष्ट्रात ५२ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाजाला १६-१७ टक्के आरक्षण कसे देणार, हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्यातील आरक्षण वेगळी ठेवावीत, असे आंबेडकर म्हणाले.गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असा भ्रम सरकारकडून पसरविला जात आहे. मराठा समाजाला अजून कायदेशीर लढाई आणि मागासवर्गीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. न्या. गायकवाडांचा अहवाल सकारात्मक आहे. मात्र यापूर्वीचे सराफ आणि बापट आयोग मराठा आरक्षणाविरोधात होते. त्यामुळे केंद्रीय मागासवर्गीय आयोगासमोर गायकवाड यांचा अहवाल जाईल, तेव्हा आधीच्या आयोगाचा विषयही मांडला जाईल. त्यामुळे याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेते, यावर मराठा आरक्षणाचे भवितव्य ठरणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.धनगर समाजाची फसवणूक - विखेमराठा इतर समाजांच्या आरक्षणाबाबत भाजपा-शिवसेना सरकारची भूमिका संदिग्ध असून, धनगर समाजाची तर मोठी फसवणूक झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण