शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुणे नागपूरसह राज्यातल्या २७ महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:59 IST

मुंबई, पुणे नागपूर, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सुमारे २७ महापालिकांमधील पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर झाली. 

पुणे : मुंबई, पुणे नागपूर, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सुमारे २७ महापालिकांमधील पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर झाली. महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्वीच संपुष्टात आला होता ; परंतु  दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांची धावपळ सुरू होती. यामुळे संपूर्ण राज्यातच महापौर पदाचा कालावधीची मुदतवाढ दिली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, त्वरित ही सोडत जाहीर होणार होती. परंतु, सध्या राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरूच आहे. अखेर दुपारी ३ वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढण्यात आली. 

    याच वर्षात लोकसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ अनेक शहरांमध्ये महापौर बदल होणार आहे. आरक्षण सोडत निघाल्यावर अनेक इच्छुक नगरसेवक सत्ताधारी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे  उंबरे झिजवण्यास सुरुवात करतात. शिवाय महापौर पदानंतर बहुतेक पक्ष इतर पक्षनेते आणि समित्यांच्याही नेतृत्वात बदल करतात. त्यामुळे ही सोडत स्थानिक पातळीवर महत्वाची आणि बहुप्रतीक्षित मानली जाते. त्यातच लोकसभा आणि विधानसभेत तिकीट न दिलेल्यांचीही नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही यातून केला जाऊ शकतो. 

महापौर सोडत • मुंबई- खुला प्रवर्ग • पुणे - खुला प्रवर्ग • नागपूर - खुला प्रवर्ग • ठाणे- खुला प्रवर्ग • नाशिक - खुला प्रवर्ग • नवी मुंबई -  खुला प्रवर्ग महिला • पिंपरी चिंचवड -  खुला प्रवर्ग महिला • औरंगाबाद- खुला प्रवर्ग महिला • कल्याण डोंबिवली -खुला प्रवर्ग • वसई विरार- अनुसूचित जमाती • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती • चंद्रपूर - खुला प्रवर्ग महिला • अमरावती- ओबीसी • पनवेल- खुला प्रवर्ग महिला • नांदेड- ओबीसी महिला • अकोला - खुला प्रवर्ग महिला • भिवंडी- खुला प्रवर्ग महिला • उल्हासनगर- खुला प्रवर्ग • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला) • परभणी- अनुसूचित जाती (महिला) • लातूर -  ओबीसी सर्वसाधारण • सांगली- खुला प्रवर्ग • सोलापूर- ओबीसी महिला • कोल्हापूर- ओबीसी महिला • धुळे -  ओबीसी सर्वसाधारण • मालेगाव - ओबीसी महिला • जळगाव खुला  -  खुला प्रवर्ग महिला

टॅग्स :MayorमहापौरMumbaiमुंबईnagpurनागपूरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे