शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

By admin | Updated: June 18, 2014 01:27 IST

योग्य उपचार करीत नसल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना १६ जून रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये घडली.

नागपूर : योग्य उपचार करीत नसल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना १६ जून रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये घडली. या घटनेने संतप्त झालेल्या मार्डच्या निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका रुग्णसेवेवर पडला असून अनेक शस्त्रक्रि या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. झायदा बी रा. सावंगी वर्धा असे महिला रुग्णाचे नाव आहे. झायदा यांच्या पोटात पाणी जमा झाल्याने त्यांना सोमवारी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड २७ मध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले होते. दुपारी ४ वाजता डॉ. अमित बाहेती कर्तव्यावर होते. झायदा यांच्या नातेवाईकांनी डॉ. बाहेती यांच्याकडे रुग्णाच्या प्रकृतिविषयी चर्चा केली. डॉ. बाहेती यांनी, जेवढे शक्य आहे तेवढे उपचार सुरू असल्याचे सांगितले. याशिवाय सर्जरी डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी झाल्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरेल, असेही ते म्हणाले. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी, ‘रुग्णाला तुम्ही खाऊ घातले नाही. लक्ष देत नाही’ असे बोलून डॉ. बाहेती यांच्याशी हुज्जत घातली. वाद वाढत गेला आणि नातेवाईकांनी डॉ. बाहेती यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉ. बाहेती यांना मारहाण झाल्याची वार्ता मेडिकलमध्ये पसरताच निवासी डॉक्टरांनी एकच गर्दी केली. डॉक्टरांनी रात्री रुग्णसेवा सुरू ठेवली, पण, सकाळपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी ८ वाजेपासून मेडिकलमधील ३०० च्यावर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले.