शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरला पर्यटकांची सुटका

By admin | Updated: August 6, 2016 00:49 IST

स्वराज्य ट्रेकिंगचे सदस्य नरेंद्र मुऱ्हे व त्यांच्या सहकारी तरुणांनी बुधवारी भीमाशंकर येथे नदीच्या पाण्यात अडकलेल्या ३० ते ४० लोकांना सुखरूप बाहेर काढले.

शिरगाव : सोमाटणे येथील स्वराज्य ट्रेकिंगचे सदस्य नरेंद्र मुऱ्हे व त्यांच्या सहकारी तरुणांनी बुधवारी भीमाशंकर येथे नदीच्या पाण्यात अडकलेल्या ३० ते ४० लोकांना सुखरूप बाहेर काढले.नरेंद्र मुऱ्हे आणि सहकारी भीमाशंकरला ट्रेकिंगसाठी (पदभ्रमण) गेले होते. भोरगिरीपर्यंत वाहनाने जाऊन तेथून भीमाशंकरकडे पदभ्रमण करीत जाण्याचे त्यांचे नियोजन होते. रोप, हार्नेस, कॅरिमॅट, स्लिंग आदी साहित्य त्यांनी सोबत घेतले होते. वाटेत भीमा नदीच्या उगमस्थानाकडे जात असताना बरेच पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. कोणतीही खबरदारी न घेता सर्व जण पाण्यात उतरत होते. पलीकडे जाताना पाणी गुडघ्यापर्यंत असल्याने त्याचा धोका कोणालाही जाणवला नाही. परंतु, परत येताना जोरदार पाऊस झाल्याने पाणी वाढले. नदीने उग्ररूप धारण केल्याने पलीकडे गेलेले पर्यटक अडकून पडले. लहान मुले, महाविद्यालयीन तरुण तरुणी, महिला, वयस्कर व्यक्ती यांचा समावेश होता. त्यांना मदतीसाठी लोकांनी बरेच प्रयत्न केले. पण, पाण्यापुढे सर्व फोल ठरले. शेवटी पाण्यात नरेंद्र मुऱ्हे आणि गोरख मुऱ्हे उडी मारून पलीकडे पोहत जाऊन झाडाला वायर रोप बांधले आणि त्याला धरून एक एक पर्यटकाला सुखरूप अलीकडे आणले. प्रशांत मुऱ्हे, प्रजोत साठे, नीलेश मुऱ्हे यांनी त्यांना मदत केली. सर्व पर्यटकांनी त्यांचे आभार मानले. (वार्ताहर)>नरेंद्र मुऱ्हे म्हणाले, की कधी आपला जीवही दुसऱ्याच्या कामी यावा आणि यामुळेच आम्ही या पर्यटकांची मदत करू शकलो.