मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी विनंती अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 02:58 AM2020-09-13T02:58:42+5:302020-09-13T02:59:07+5:30

मराठा आरक्षणाला दोन दिवसांपूर्वी अंतरिम स्थगिती देत यासंबंधीची याचिका पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग केली. तात्पुरती स्थगिती देताना न्यायालयाने इंदिरा सहानी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा संदर्भ दिला.

Request for lifting the moratorium on Maratha reservation | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी विनंती अर्ज

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी विनंती अर्ज

googlenewsNext

औरंगाबाद : मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठविण्यात यावी, असा विनंती अर्ज याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने सरन्यायाधीशांकडे दाखल करण्यात आला. या अर्जावर सप्ताहात सुनावणी होणे अपेक्षित आहे.
मराठा आरक्षणाला दोन दिवसांपूर्वी अंतरिम स्थगिती देत यासंबंधीची याचिका पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग केली. तात्पुरती स्थगिती देताना न्यायालयाने इंदिरा सहानी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा संदर्भ दिला.
विनोद नारायण पाटील यांनी अ‍ॅड. संदीप देशमुख यांच्यामार्फत ११ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर अर्ज (क्रमांक ९०८३०/२०२०) दाखल करून अंतरिम स्थगिती उठविण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

Web Title: Request for lifting the moratorium on Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.