सिहस्थ पर्वण्यांसाठी प्रशासनाचे फेरनियोजन

By Admin | Updated: August 31, 2015 01:19 IST2015-08-31T01:19:47+5:302015-08-31T01:19:47+5:30

सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीसाठी केलेली रस्तेबंदी, बॅरिकेडिंगमुळे भाविकांबरोबरच नाशिककरांचेही प्रचंड हाल होऊन स्नानास अपेक्षित गर्दी न झाल्याने सुरक्षेच्या अतिरेकावर चौफेर

Representation of the Administration for Sihasal Mountains | सिहस्थ पर्वण्यांसाठी प्रशासनाचे फेरनियोजन

सिहस्थ पर्वण्यांसाठी प्रशासनाचे फेरनियोजन

नाशिक : सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीसाठी केलेली रस्तेबंदी, बॅरिकेडिंगमुळे भाविकांबरोबरच नाशिककरांचेही प्रचंड हाल होऊन स्नानास अपेक्षित गर्दी न झाल्याने सुरक्षेच्या अतिरेकावर चौफेर टीका झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चिंतन केले. पुढील पर्वण्यांसाठी फेरनियोजन करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
पुढील दोन्ही पर्वण्यांमध्ये भाविकांना कमीत कमी त्रास होईल, असा बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, पहिल्या पर्वणीसाठी भाविकांची गर्दी तशी कमीच असते़ मात्र प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सुमारे २० लाख भाविकांनी गोदाघाटांवर स्नान केले आहे़ सायंकाळी ५ नंतर गर्दी वाढल्यामुळे पोलिसांना पुन्हा बॅरिकेडिंग करावी लागली़ पोलिसांच्या नियोजनामुळेच कोणतीही दुर्घटना घडली नाही़
सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांना मोठी पायपीट करावी लागली. पुढील पर्वण्यांमध्ये पायपीट कमी व्हावी, नाशिककरांनाही अतिरक्त बंधन वाटू नये, अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात सर्वच भाविकांची इच्छा रामकुंडामध्ये स्नान करण्याची असते. मात्र बॅरिकेडिंग व पोलीस बंदोबस्त ठेवला नाही व सर्व भाविकांना एकाच वेळी रामकुंडावर सोडले तर दुर्घटना घडण्याची भीती आहे. १३ व १९ सप्टेंबरला पुढील पर्वण्या होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Representation of the Administration for Sihasal Mountains