कारवाईची माहिती तक्रारदाराला कळवा

By Admin | Updated: April 30, 2016 00:31 IST2016-04-30T00:31:40+5:302016-04-30T00:31:40+5:30

तक्रारदारांच्या अर्जावर काय कारवाई केली, याची माहिती लेखी स्वरुपात तक्रारदाराला कळविण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत.

Report the information to the complainant | कारवाईची माहिती तक्रारदाराला कळवा

कारवाईची माहिती तक्रारदाराला कळवा

पुणे : तक्रारदारांच्या अर्जावर काय कारवाई केली, याची माहिती लेखी स्वरुपात तक्रारदाराला कळविण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. त्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असल्याचे सांगितले होते. पोलीस अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
तसेच दररोज आयुक्तालयामध्ये नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना आदेश दिले जात आहेत.
गेल्या महिनाभरात नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन दिलेल्या तक्रार अर्जांवर काय कारवाई केली, त्यांचा अर्ज हा दिवाणी स्वरूपाचा असल्यास त्याबाबत त्यांना लेखी कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Report the information to the complainant