शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मागास आयोगाचा अहवाल जनतेलाही समजला पाहिजे, अजित पवार यांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 00:53 IST

कार्तिक एकादशीला राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे पांडुरंगाला घातले जाते मात्र ज्येष्ठ मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे.

मुंबई : कार्तिक एकादशीला राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे पांडुरंगाला घातले जाते मात्र ज्येष्ठ मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे. त्यामुळे मागास आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवा, जर ठेवला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.आपण विधानसभेत अहवाल मांडण्याविषयी वेगळी भूमिका घेतली पण पुढे आपल्याला काही मुद्दे मांडायचे होते, सभागृहात गोंधळ सुरू झाल्याने आपल्याला बोलू दिले गेले नाही म्हणून आपण माध्यमांसमोर येऊन ही भूमिका स्पष्ट करत आहोत असेही पवार म्हणाले.आमची सर्व विरोधी पक्षाची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आहे. मागास आयोगाच्या शिफारसी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा, अशी मागणी पवार यांनी केली. सभागृहामध्ये नुसती वांझोटी चर्चा करून फायदा नाही. मागास आयोगाचा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ‘टीस’चा अहवाल सभागृहात ठेवा त्यामुळे त्यात काय आहे ते तरी कळेल, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार