विहिरीतील गाळ काढताना चौघांचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: June 24, 2016 05:13 IST2016-06-24T05:13:22+5:302016-06-24T05:13:22+5:30

पिंपळवाड निकुंभ (ता. चाळीसगाव) येथे गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. चारही जणांचे मृतदेह सायंकाळी विहिरीबाहेर काढण्यात आले.

Removing the mud of the well, the four die drowning | विहिरीतील गाळ काढताना चौघांचा बुडून मृत्यू

विहिरीतील गाळ काढताना चौघांचा बुडून मृत्यू

जळगाव : पिंपळवाड निकुंभ (ता. चाळीसगाव) येथे गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. चारही जणांचे मृतदेह सायंकाळी विहिरीबाहेर काढण्यात आले.
पिंपळवाड निकुंभ येथे विजय चिंधा नागरे (वय ४५) यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. धुडकू कारभारी भिल (वय ३२) आणि भानुदास कथ्थू भिल (वय २७) हे गाळ काढत होते. तिघेही विहिरीतील गाळात अडकून बुडाले. ही घटना गावात कळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. या वेळी नागरे यांचे नातेवाईक अंकुश बंडू नागरे (वय ३०) हे त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. त्यांचाही बुडून मृत्यू झाला. ही वार्ता समजताच विहिरीभोवती गर्दी झाली.
तहसीलदार कैलास देवरे, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड आल्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Removing the mud of the well, the four die drowning