राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह
By Admin | Updated: July 11, 2017 15:56 IST2017-07-11T15:42:19+5:302017-07-11T15:56:48+5:30
राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण काम असल्याचे मत तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण काम असल्याचे मत तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. लोकमत वॉटर समिट 2017 या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, राज्यातील छोट्या नद्या मरत आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी समाजाला नद्यांशी जोडले जायला हवे. तसेच, नद्यांतील पाणी तलावात सोडले तर कितीही पूर आला तरी कोणतेही संकंट ओढावणार नाही. नद्यांच्या बाबतीत मध्यप्रदेश सरकारने चांगले काम केले आहे. महाराष्ट्रात नमामी चंद्रभागा यात्रा सुरु होणार असून जनतेने या यात्रेत मोठ्याप्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. याचबरोबर, त्यांनी सांगितले की, देशभर जलसाक्षरता यात्राही आम्ही राबवत आहोत. जलसाक्षरता हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. सुरुवातीला मी फावड्याने तलाव करायचो. मात्र, आता मी लोकांच्या डोक्यात तलाव करण्याचे काम हाती घेतले, त्यामुळे त्यांना पाण्याचे महत्व कळल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.