सरकार हिंदूंनी निवडून दिले आहे हे लक्षात ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 20:40 IST2016-08-04T20:40:36+5:302016-08-04T20:40:36+5:30
सरकार हिंदूंनी निवडून दिले आहे हे लक्षात ठेवा. हिंदूत्ववादी शासन सत्तेत येऊनही हिंदूत्वनिष्ठांवरील अन्याय थांबत नसतील तर पुढील सर्व निवडणुकांत याचे परीणाम भोगावे लागतील

सरकार हिंदूंनी निवडून दिले आहे हे लक्षात ठेवा
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ४ : सरकार हिंदूंनी निवडून दिले आहे हे लक्षात ठेवा. हिंदूत्ववादी शासन सत्तेत येऊनही हिंदूत्वनिष्ठांवरील अन्याय थांबत नसतील तर पुढील सर्व निवडणुकांत याचे परीणाम भोगावे लागतील ,अशी धमकी कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या विविध हिंदूत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात देण्यात आली .
याप्रसंगी ' आम्ही सारे सनातनी ' अशी घोषणाबाजी करण्यात आली. पानसरे व दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले समीर गायकवाड व विरेंद्र तावडे हे सत्शील साधक आहेत. त्यांना पुरोगाम्यांच्या दबाबापोटी या खुनप्रकरणात गोवण्यात आले आहे.
पानसरे,दाभोलकर ,कलबुर्गी हे सातत्याने हिंदू धर्माविरोधात गरळ ओकत होते अशी टिका मेळाव्यात करण्यात आली