शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Remdesivir Shortage: आधीच टंचाई, त्यात रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 16:55 IST

hetero pharma biggest maker of Remdesivir injection in India: देशात रेमडेसीवीर लसीचा तुटवडा आहे. यामुळे ही लस मिळविण्यासाठी नागरिक मेडिकलसमोर दिवस-दिवस उभे आहेत. अनेकांना ही लस न मिळाल्याने त्यांचे आप्तस्वकीय गमवावे लागले आहेत.

कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडेसीवीर (Remdesivir) लस खूप मोठी संजिवनी ठरत आहे. या लसीचा तुटवडा गेल्या काही काळापासून भासू लागला असून ऐन कोरोनाकाळात ही लस बनविणारी एक मोठी कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आज दिवसभरात राज्याला एकाही नव्या रेमडेसीवीर लसीचा पुरवठा झालेला नाहीय. (hetero pharma production plant closed for two days, Remdesivir Production stopped.)

देशात रेमडेसीवीर लसीचा तुटवडा आहे. यामुळे ही लस मिळविण्यासाठी नागरिक मेडिकलसमोर दिवस-दिवस उभे आहेत. अनेकांना ही लस न मिळाल्याने त्यांचे आप्तस्वकीय गमवावे लागले आहेत. अशातच पुण्यात रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते.

देशात रेमडेसीवीर लस बनविणाऱ्या ७ कंपन्या आहेत. यापैकी एक मोठी कंपनी असलेली हैदराबादची हेट्रो फार्मा (hetero pharma) ही कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे लसीची मोठी गरज असताना ही कंपनी बंद राहिल्याने याचा फटका लसीच्या पुरवठ्यावर झाला आहे. या कंपनीचा हैदराबादचा प्लांट बंद आहे. ही एकटी कंपनी दररोज ३२ हजार लसी तयार करते. गेले दोन दिवस सुटी असल्याने या कंपनीचे उत्पादन ठप्प झाले होते. अन्य सहा कंपन्या दिवसाला ३० हजार इंजेक्शन बनवितात. या कंपन्यांकडूनेखील महाराष्ट्राला पुरवठा होतो. मात्र, आज दिवसभरात एकही रेमडेसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळालेले नाहीय. (No Single Remdesivir given to Maharashtra today.)

पुण्यात जी लस उपलब्ध झालीय ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या पातळीवर मिळविलेली आहेत. पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येणार होता. मात्र तो आज दुपारी दाखल झाला.  

कोणकोणत्या कंपन्या हे इंजेक्शन बनवितात...हेट्रो ड्रग्ज, झायडस कॅडिला, सिप्ला, डॉ. रेड्डीज, व्हायट्रीस, बायोकॉनची उपकंपनी सिंजीन इंटरनॅशनल आणि ज्युबिलंट फार्मोव्हा या सात कंपन्या रेमडेसीवीर इंजेक्शन बनवितात.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या