शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:16 IST

Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे, तर मविआमध्ये जागावाटपावरून आघाडी कोणत्याही क्षणी तुटेल अशी स्थिती आहे. काँग्रेस-उद्धव ठाकरे शिवसेनेत १७ जागांवरून वाद विकोपाला गेला असून मातोश्रीसमोर न झुकण्याची भुमिका राज्यातील नेत्यांनी घेतली आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या गोटातून खळबळजनक वृत्त येत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे. याची चाहूल लागताच दोन्ही आमदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. ठाकरे गटाची ताकद कोकण पट्टा आणि मुंबईत जास्त आहे. तिथे भाजपा आणि शिंदे गटाचे तगडे आव्हान आहे. यामुळे उद्धव ठाकरे ताकही फुंकून पित असल्याची स्थिती आहे. उमेदवार निवडताना चांगली टक्कर देऊ शकेल असा उमेदवार त्यांना द्यावा लागणार आहे. 

मुंबईत कट्टर विरोधक भाजपाची आणि शिंदे शिवसेनेची ताकद आहे. परंतू सोबत असलेल्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तर आघाडी झाली तरी काँग्रेसची ताकद कामी येईल याची शाश्वती नाही. यामुळे ठाकरे इतर मतदारसंघांत विद्यमान आमदारांना तिकीट देणार असले तरी शिवडी आणि चेंबूरमध्ये नव्या चेहऱ्यावर डाव लावण्याची शक्यता आहे. 

यामुळे शिवडीचे आमदार अजय चौधरी व चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्फेकर हे दोघेही मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवडीमधून इच्छुक असणारे लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे देखील मातोश्रीवर आले आहेत. चेंबूरमधून माजी नगरसेवक अनिल पाटणकरांनी निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे. यामुळे ठाकरे या दोन आमदारांना वगळून त्यांचे तिकीट इच्छुक उमेदवारांना देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

याचबरोबर इतर मतदारसंघातील इच्छुकही मातोश्रीवर दाखल होत आहेत. भायखळ्यातून रमाकांत रहाटे, मनोज जामसुतकर, किशोरी पेडणेकर या इच्छुक आहेत. घाटकोपर पश्चिममध्ये सुरेश पाटील आणि संजय भालेकर हे स्पर्धेत आहेत. मागाठाणेमध्ये  संजना घाडी आणि उदेश पाटकर इच्छुक आहेत. तर कुर्ल्यामधून प्रविणा मोरजकर या इच्छुक आहेत.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकshivadi-acशिवडीchembur-acचेंबूर