शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंट सुरू झाले, धार्मिक स्थळेही उघडणार; मुख्यमंत्री करताहेत संबंधितांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:41 IST

सरकारवर विविध संघटना, संस्थानांचा दबाव

मुंबई : राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले. आता मंदिरे व इतर धार्मिक स्थळंही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू झाले. पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळं का उघडत नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली. रेस्टॉरन्ट, बार हे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करीत असल्याची माहिती आहे. विविध राज्यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. महाराष्ट्रात मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांना भेटून मागणी रेटली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते.शाळा सुरू करण्यासाठी केंद्राची नियमावली जारीदेशभरातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देताना, केंद्र सरकारने त्यासाठीची नियमावली सोमवारी जारी केली. मात्र प्रत्यक्ष शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी परिस्थिती पाहून घ्यायचा आहे.केंद्राने परवानगी दिली असली तरी जवळपास सर्व राज्यांनी नोव्हेंबरमध्ये वा त्यानंतर शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे. इतक्यात शाळा सुरू करू नयेत आणि त्या सुरू केल्या तरी आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे बहुसंख्य पालकांचे म्हणणे आहे.शिर्डीची संपूर्ण अर्थव्यवस्था ही येथील श्री साईबाबा मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर खुले करावे अशी लाखो भक्तांची मागणी आहे. राज्यातील मंदिरांवर अनेक घटक अवलंबून आहेत हे लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.- सुरेश हावरे, अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिर