मजहब नहीं सिखाता... ही दोस्ती तुटायची नाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 05:59 IST2020-11-02T05:58:46+5:302020-11-02T05:59:12+5:30
Amaravati : ईश्वरदीन उसरे, शेख सनाउल्ला सौदागर व पुंडलिकराव पवार हे गावातील सत्तरी ओलांडलेले वर्गमित्र.

मजहब नहीं सिखाता... ही दोस्ती तुटायची नाय!
- मनीष तसरे
अमरावती : विश्वास आणि संवेदना हरवत चाललेल्या या काळात वलगावातील तिघे वर्गमित्र जसे सच्च्या दोस्तीचे आदर्श उदाहरण आहेत, तसेच ते राष्ट्रीय एकात्मतेचेही प्रतीक आहेत. हिंदू कुंभाराने घडविलेले दिवे मुस्लिम व्यक्ती उन्हात वाळविण्याचे काम करतो.
ईश्वरदीन उसरे, शेख सनाउल्ला सौदागर व पुंडलिकराव पवार हे गावातील सत्तरी ओलांडलेले वर्गमित्र.
ईश्वरदीन मातीचे दिवे तयार करतात. शेख सनाउल्ला सौदागर हे मिस्त्रीकाम करतात. पुंडलिकराव पवार त्यांना मदत करतात. या मैत्रीने धर्माच्या भिंती तर केव्हाच वितळवून टाकल्या.ईश्वरदीन पणत्या घडविण्याचे काम करतात. त्या वाळविण्यासाठी पुंडलिकराव व शेख सनाउल्ला हे खास वेळ काढून येतात.