नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर

By Admin | Updated: July 9, 2014 02:34 IST2014-07-09T02:34:54+5:302014-07-09T02:34:54+5:30

नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला.

Released for News of the Change | नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर

नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर

कराड/पंढरपूर : राज्यात नेतृत्वबदल होणार नाही, असे ठामपणो सांगत नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅन्थनी समितीने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात नेतृत्वबदल होईल, अशा चर्चाना ऊत आला आहे. पक्ष नेतृत्वाने कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आज दिवसभर होती; मात्र स्वत: विखे यांनीच याचा इन्कार केला. ते आज मुंबईतच होते. उद्योगमंत्री नारायण राणो यांचेही नाव चर्चेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 144 जागांची मागणी करत प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, हे त्यांचं वैयक्तिक मत असून त्यावर मी भाष्य करणार नाही. पण जागावाटपाचा फॉम्यरुला जुनाच असून त्यात फारसा बदल होणार नाही. जागांच्या अदलाबदलीबाबत दोन्ही पक्षांच्या दिल्लीतील नेत्यांची बैठक होऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल. आम्ही पाच निवडणुका एकत्रित लढलोय. तुम्ही चिंता करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
काही मंडळी नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरवित आहेत. जे चर्चा करीत आहेत त्यांनाच जाऊन विचारा म्हणजे तुम्हाला अचूक उत्तर मिळेल. 
                             - मुख्यमंत्री

 

Web Title: Released for News of the Change