शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

येसूबाईची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:08 IST

येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते..

ठळक मुद्देइतिहास प्रेमी मंडळातर्फे महाराणी येसूबाई यांच्या सुटकेच्या त्रिशताब्दीनिमित्त पुणे ते सातारा रथयात्रा

पुणे : येसूबाईंची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय आहे. येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या या कार्यातून आमच्या फौजा अटकेपार गेल्या. शतके, सहस्त्रके ओलांडली तरीदेखील येसूबाईसाहेबांकडून घेतलेली प्रेरणा आपण विसरू शकणार नाही, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. इतिहास प्रेमी मंडळातर्फे महाराणी येसूबाई यांच्या सुटकेच्या त्रिशताब्दीनिमित्त पुणे ते सातारा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते महाराणी येसूबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानाजवळ रथयात्रेचा शुभारंभ झाला. पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, देवदेवेश्वर संस्थानचे रमेश भागवत, प्रा. सु. ह. जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यावेळी उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘महाराणी येसूबाई यांचे कार्य खूप मोठे आहे. छत्रपती संभाजी महाराजांनतर सर्व गोष्टी त्यांनी सांभाळल्या. त्यांच्या सुटकेच्या घटनेची आठवण ठेवून त्रिशताब्दी साजरी करणे ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. तसेच त्यांचे कर्तृत्व कधीही विस्मृतीत जाणार नाही.’मोहन शेटे म्हणाले, ‘औरंगजेबाने सन १६८९ साली संभाजी महाराज गेल्यानंतर येसूबाई आणि युवराज शाहू राजांना कैदी बनविले. सन १७०७ मध्ये औरंगजेब मेल्यावर शाहू राजांची सुटका झाली. परंतु येसूबाईंना दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी दिल्लीच्या राजकारणाचा फायदा घेत चातुयार्ने येसूबाईंची सुटका केली. तीस वर्षांची शिक्षा भोगून ४ जुलै १७१९ रोजी येसूबाई राजधानी सातारा येथे आल्या. या घटनेला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल  इतिहास प्रेमी मंडळातर्फे रथयात्रा काढून या घटनेची त्रिशताब्दी साजरी करण्यात आली.’  पुणे ते सातारा राजमाता येसूबाईंच्या पुतळा असलेल्या रथयात्रेस एसएसपीएमएस शिवाजी पुतळा येथून प्रारंभ झाला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे पुतळा येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सातारा येथील पवईनाका शिवाजी पुतळ्यापासून राजवाड्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. 

........... 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजmarathaमराठा