डीएपीचा हट्ट सोडा: गंधकाचा बोनस मिळवा

By Admin | Updated: June 20, 2014 00:14 IST2014-06-20T00:08:39+5:302014-06-20T00:14:59+5:30

कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांमध्ये जागृती

Release DAP: Get sophisticated bonuses | डीएपीचा हट्ट सोडा: गंधकाचा बोनस मिळवा

डीएपीचा हट्ट सोडा: गंधकाचा बोनस मिळवा

वाशिम: खरिप पीक पेरणीसाठी शेतकर्‍यांना कोणते खत उपयुक्त आहे, सोयाबीनसाठी कोणत्या खताची मात्रा शास्त्रीयदृष्टया जास्त किफायतशिर ठरणार याचा फार्मूला वाशिमच्या कृषी विभागाने तयार केला आहे. केवळ डीएपी खताचा हट्ट धरणार्‍या शेतकर्‍यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याबरोबरच सोयाबीन उत्पादनवाढीचा दावा करणारा हा फाम्र्यूला आहे.याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती केली जात आहे.
गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई निर्माण झाली यावर उपाय म्हणून वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले आहे. घरच्या घरी बियाणे उगवणक्षमता कशी तपासावी याचे साधे सोपे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना बहाल केल्यानंतर आता कृषी विभागाने खत वापरण्याचा नवा उपक्रम साकारला आहे. सोयाबीन पिकासाठी बहुतांश शेतकरी डीएपी खताची मागणी करतात.डीएपीमुळे उत्पादनात वाढ होते असा समज अनेक शेतकर्‍यांचा झाल्याने डीएपी खताची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्यक्षात डीएपीमधून सोयाबीनला आवश्यक असणारे गंधक(सल्फर)अजिबाज मिळत नसल्याचा दावा वाशिमच्या कृषी विभागाने केला आहे. याउलट युरिया + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश किंवा २0:२0:0:१३ + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा अनुक्रमे १६.५0 व १७.५0 एवढी सोयाबीनला दिली तर ते उत्तम ठरते.सोयाबीन तेलवर्गीय पीक असल्याने त्यास गंधकाची अतिरिक्त आवश्यकता असते. युरीया + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खतांचा एकरी खर्च १७00 रूपयाच्या आसपास तर २0:२0:0:१३ + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खतांचा एकरी खर्च २0८0 रूपये तर डीएपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खताचा एकरी खर्च २२00 रूपयाच्या घरात जातो. नत्र, स्फूरद व पालाशचे प्रमाण जवळपास सारखेच असल्याने शेतकर्‍यांनी कोणत्याही एकाच खताचा आग्रह धरू नये असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती सुध्दा केली जात आहे.

 

Web Title: Release DAP: Get sophisticated bonuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.