लांजाजवळ आरामबस दरीत कोसळली

By Admin | Updated: September 5, 2016 04:33 IST2016-09-05T04:33:36+5:302016-09-05T04:33:36+5:30

खासगी आरामबस आंजणारी घाटीत शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार

Relax in the valley near the lanza collapsed | लांजाजवळ आरामबस दरीत कोसळली

लांजाजवळ आरामबस दरीत कोसळली

लांजा (जि.रत्नागिरी) : मुंबईहून कुणकेश्वर (जि. सिंधुदुर्ग) येथे जाणारी खासगी आरामबस आंजणारी घाटीत शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे घडला.
प्रकाश रावजी लब्धे (५४, विरार, मुंबई), कृष्णा दत्ताराम मुळ्ये (३५, राजापूर) अशी मृतांची नावे असून प्राजक्ता प्रकाश लब्धे (कुणकेश्वर), प्रथमेश प्रकाश लब्धे (कुणकेश्वर), शुभांगी राजेंद्र राड्ये (१९, तरळे, कणकवली) हे तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे.
ही आरामबस कुणकेश्वरला जाण्यासाठी शनिवारी रात्री मुंबईच्या परेलहून निघाली. चालक गणेश नारायण डामरे (३८, कणकवली) हा भरधाव बस चालवीत होता, असे प्रवाशांनी सांगितले. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आंजणारी घाट उतरत असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन बस आदळली. त्यानंतर ती खोल दरीत गेली. या अपघातात अन्य १३ जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. (प्रतिनिधी)
बसचालक-मालकावर गुन्हा
या अपघातास जबाबदार चालक गणेश डामरे आणि बसमालक राजेश विश्वनाथ गवाणकर (सांताक्रुझ, मुंबई) या दोघांवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
वाहतूक खोळंबली
दरीत कोसळलेल्या खासगी आरामबसला बाहेर काढण्यासाठी रत्नागिरीहून क्रेन बोलावण्यात आली होती. ही बस काढत असताना जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूकथांबविण्यात आल्याने इतर प्रवाशांना याचा फटका बसला.
>दोन झाडे पाडली : हा अपघात एवढा भीषण होता की, दोन झाडे पाडत ही बस दरीत कोसळली. त्यातील काही प्रवाशांनी दरीतून वर येऊन अपघाताची कल्पना दिली.

Web Title: Relax in the valley near the lanza collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.