शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:34 AM

सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे

ठळक मुद्देराजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्येही विस्तार वाढला...

अविनाश कोळी ।सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये रक्तदात्यांचा सोशल मीडिया ग्रुप स्थापन करून त्यांना मदत पुरविली जात आहे. रक्ताच्या नात्यांचे हे जाळे आता देशभर पसरविण्याचे काम गतीने पुढे जात आहे.तासगावमधील विक्रम यादव यांनी गरिबीला तोंड देत या सामाजिक चळवळीला जन्म दिला. अनेक दु:खद प्रसंगातून बोध घेताना त्यांनी या चळवळीला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षातील त्यांची ही धडपड आता देशव्यापी बनू पाहत आहे. बॉम्बे ओ रक्तगट हा दुर्मिळातील दुर्मिळ रक्तगट मानला जातो. अशा दुर्मिळ रक्तदात्यांना व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एकत्र केले. दुसरीकडे त्यांना पाठबळ देणाऱ्या अन्य रक्तदात्यांनाही सोबत घेतले. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३0 धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा व अन्य राज्यात ज्याठिकाणी या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे.सांगली जिल्ह्यात रुजलेल्या चळवळीने अनेकांना जीवदान दिले. गरोदर मातांपासून लहान मुलांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांना कोणत्याही वेळी रक्त पुरविण्याची व्यवस्था त्यांनी केली. आपल्या राज्यापुरताच आपण विचार न करता, अन्य राज्यातील देशबांधवांचाही विचार केला पाहिजे, असा विचार यादव यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून अन्य राज्यात रक्तदात्यांच्या चळवळीची बांधणी सुरू केली.आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. भविष्यात देशभरातील अन्य राज्यांमध्ये या चळवळीच्या विस्ताराचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.असे पुरविले जाते रक्त...एखाद्या राज्यातील रुग्णास बॉम्बे ओ किंवा अन्य कोणत्या रक्ताची गरज असेल, तर मुंबईतील थिंक फौंडेशनकडे जिल्ह्यातील किंवा महाराष्टÑातील रक्तदाता रक्तदान करतो. त्यानंतर विमानाने ते रक्त संबंधित राज्याच्या राजधानीत किंवा जवळच्या शहरात पोहोचविले जाते. तिथून त्याठिकाणचा कार्यकर्ता गरजेच्या ठिकाणी रक्त पोहोचवतो. यासाठीचा खर्च भागविण्यासाठी राज्यातील १५ हजार ७३0 रक्तदाते प्रत्येकी दहा रुपयांप्रमाणे निधी गोळा करतात. त्यातून विनामूल्य हे रक्त रुग्णापर्यंत पोहोचविले जाते.असे आहेत परराज्यातील ग्रुपहिमाचल प्रदेशात ५00 दात्यांचा गट असून त्याठिकाणी ‘बॉम्बे ओ’चा दाता नाही.मध्य प्रदेशात ८00 रक्तदात्यांचा गट असून त्यामध्ये ‘बॉम्बे ओ’ या गटातील एकच रक्तदाता आहे. या गटाशी यादव यांचा दैनंदिन संपर्क आहे.राजस्थानमध्ये ३ हजार रक्तदात्यांचा गट असून त्यामध्ये दोघेजण ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटाचे आहेत.यापूर्वी कोलंबिया आणि मलेशियामधील रुग्णांना या ग्रुपने बॉम्बे ओ या रक्ताचा पुरवठा केला आहे. राज्य व देशाच्या सीमा ओलांडत रक्ताची नाती तयार करणाºया या गटाने त्यांचा कार्यविस्तार वेगाने वाढविण्यास सुरुवात केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारतState Governmentराज्य सरकार