शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 11:09 IST

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाकडून चौकशी समिती नियुक्त हडपसर दुय्यम निबंधक कार्यालयात एका दिवसात हजारो बोगस दस्त नोंदणी

सुषमा नेहरकर-शिंदे

 पुणे  :  शासनाने सर्वसामान्य नागरिकांची बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी "रेरा" कायदा लागू केला. परंतु दुय्यम निबंधकांना हाताशी धरून रेरा कायद्याचे उल्लंघन करून संपूर्ण राज्यात सर्रास दस्त नोंदणी सुरू आहे. यामध्ये हे प्रमाण पुणे जिल्ह्यात त्यातही शहरामध्ये सर्वाधिक असल्याच्या अनेक तक्रारी थेट शासनाकडे गेल्या आहेत. यामुळेच राज्य शासनाने पुण्यातील रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केलेल्या सर्व व्यवहारांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक नियुक्त केले आहे. या चौकशी पथकांने तपासणी करून 1 डिसेंबरच्या आता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. पुण्यात बाणेर, हडपसरसह पीएमआरडीएच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत परवानगी असलेल्या, रेरा कायद्याचे उल्लंघन केलेल्या आणि गुंठेवारीला बंदी असताना सरास बोगस दस्त नोंदणी केली असल्याची तक्रार शासनाला प्राप्त झाली असून, त्यानुसार ही चौकशी समिती नियुक्त करण्यात येत असल्यास शासनाने थेट आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे. 

शासनाने काढलेल्या आदेशात  " रेरा कायद्याचे उल्लंघन करुन दस्त नोंदणी झाल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक, हवेली क्र.३ या कार्यालयासोबतच पुणे शहरातील अन्य दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची कार्यवाही पार पाडली जाते किंवा कसे? याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्याकरीता तपासणी पथक  नियुक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्याकरीता आणि उक्त तपासणी पथकाचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यां कार्यालयामार्फत शासनास दि.०१ डिसेंबर, २०२० पूर्वी सादर करावा असे स्पष्ट केले आहे. ------ही आहे चौकशी समिती - गोविंद कराड, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, लातूर विभाग, - भरत गरुड. प्रभारी, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (मुख्यालय),- विजय भालेराय,  सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव-  उदयराज चव्हाण,  सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर

टॅग्स :PuneपुणेRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Revenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकारfraudधोकेबाजी