शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी 16 लाख शेतक-यांची नोंदणी, 8 लाख शेतक-यांनी भरले आॅनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी अर्ज भरले आहेत.

अमरावती, दि. 14 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात ‘आपले सरकार’ पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे. अद्याप तीन लाख शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी असल्याने योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.योजनेची १५ सप्टेंबर ही 'डेडलाइन' आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत  प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतरच्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.सुरुवातीपासूनच  योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही, बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाइन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असला तरी एक दिवसच मुदत शिल्लक असल्याने योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे.बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २.१६ लाख अर्जअमरावती विभागात १५ लाख ६० हजार शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४,२२,०६४ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली. २,१६,३२६ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात २,२१,३४३ नोंदणी व १,१२,८८१ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,२९,२०९, शेतकºयांची नोंदणी व १,४२,६८५ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात २,१८,८९७ शेतक-यांची नोंदणी व १,०६,५६९  अर्ज भरले  आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४,०५,०३८ शेतक-यांची नोंदणी व २,०३,२६० शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.