राष्ट्रीय महापुरुषांत शिवाजी महाराजांची नोंद करा!
By Admin | Updated: August 23, 2014 01:15 IST2014-08-23T01:15:33+5:302014-08-23T01:15:33+5:30
राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद करण्याची मागणी आधुनिक भारत परिवार संघटनेने केली आहे.

राष्ट्रीय महापुरुषांत शिवाजी महाराजांची नोंद करा!
मुंबई : राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद करण्याची मागणी आधुनिक भारत परिवार संघटनेने केली आहे. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे तशी मागणी राज्य शासनाने करावी, म्हणून संघटनेने सोमवारी आझाद मैदानात धरणो आंदोलनाची हाक दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, म़ जोतिबा फुले अशा महापुरुषांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांची नोंदच नसल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील खांबे यांनी दिली. याबाबत 12 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडेही घातले. मात्र या दोन्ही नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी 9 ऑगस्टला क्रांतिदिनी राज्यभर मागणी पोहोचवण्याचा निर्धार करीत ठाणो येथील पाचपाखडीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याची सुरुवात करणा:या महाराजांची नोंद राष्ट्रीय महापुरुषांत न झाल्याने आज त्यांचा योग्य मान राखला जात नाही़ धरणो आंदोलनानंतर संघटनेतर्फे राज्यभर मेळावे घेऊन त्याबाबत योग्य जनजागृती करण्यात येईल, असेही खांबे यांनी सांगितले. त्या जनजागृतीत राष्ट्रीय महापुरुष म्हणून नोंद झाल्यानंतर संबंधित महापुरुषाला मिळणारा दर्जा, पत आणि मान-सन्मानाविषयीची माहिती लोकांना देण्यात येईल. (प्रतिनिधी)