शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजीच्या दरात घट ; जवळपास साडे आठ लाख ग्राहकांना मिळणार दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 21:18 IST

गॅसचे दर कमी केल्याचा सर्वाधिक फायदा ‘पीएमपी’ला मिळणार

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने घरगुती वापराचा गॅस (पीएनजी) व वाहनांच्या सीएनजी गॅसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनजीचे दर प्रति किलो ५० पैसे तर सीजएनजीचे ८५ पैशांनी कमी केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री पासून सुधारित दर लागु होतील, अशी माहिती कंपनीचे वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यांनी दिली.

‘एमएनजीएल’चे जवळपास साडे आठ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी ३० टक्के ग्राहक घरगुती पीएनजी गॅसचे असून उर्वरीत ७० टक्के ग्राहकांमध्ये वाहने व उद्योगांचा समावेश होते. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या अनेक बससाठी सीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे कंपनीकडून पीएमपीला सर्वाधिक गॅस पुरवठा केला जातो. त्यामुळे गॅसचे दर कमी केल्याचा सर्वाधिक फायदा ‘पीएमपी’ला मिळणार आहे.

दरम्यान, शुक्रवारपर्यंत सीएनजीचे दर प्रति किलो ५४ रुपये ८० पैसे तर पीएनजीचे २७ रुपये ७० पैसे एवढे होते. शुक्रवारी मध्यरात्री पासून हे दर अनुक्रमे ५३ रुपये ९५ पैसे व २७ रुपये २० पैसे एवढे असतील. एप्रिल महिन्यामध्येही कंपनीकडून दर कमी करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांनी दरात कपात करण्यात आली. एकीकडे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असताना कंपनीकडून गॅसचे दर कमी केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे, असे सोनटक्के यांनी सांगितले.----------------सीएनजी व पीएनजीचे सुधारीत दरगॅस दर (प्रति किलो)सध्या सुधारीतसीएनजी ५४.८० ५३.९५पीएनजी २७.७० २७.२०---------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल