शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलनात १० लाख लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 14:23 IST

दूध संकलनात घट झाल्याने खरेदी दरामध्ये झाली वाढ; जुलैपासून दरात आणखीन वाढ

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात ८० लाख लिटर दूध संकलन होत होतेदुष्काळी परिस्थितीमुळे दूध संकलनाला फटका बसला देशभरातील विविध राज्यात असलेल्या दुष्काळामुळे दूध संकलनात वरचेवर मोठी घट

सोलापूर: देशभरातील विविध राज्यात असलेल्या दुष्काळामुळेदूध संकलनात वरचेवर मोठी घट होत असल्याने दूधदरात वरचेवर वाढ होत आहे. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात १० लाख लिटर दूध संकलन कमी झाल्याने गायीच्या दूध खरेदी दरात दोन महिन्यात चार ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. एक जुलैनंतर खरेदी दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मागील वर्षीच्या उन्हाळ्यात व त्यानंतर राज्यात मागणीपेक्षा अधिक दूध संकलन होत होते. त्यामुळे उन्हाळ्यात दूध खरेदीदर वाढण्याऐवजी कमी झाले होते. गायीचे दूध खरेदीदर १७ रुपये लिटरवर आल्यानंतर शासनाने प्रति लिटर ५ रुपये अनुदान सुरू केले. हे अनुदान जानेवारी २०१९ पर्यंत सुरू होते. दूध संकलनात घट होण्यास सुरुवात झाल्यानंतर शासनाने दूध संघांना गायीच्या दुधाला २२ रुपये लिटरचा दर देण्याचे आदेश काढले तर अनुदान प्रति लिटर तीन रुपये देण्यास सुरुवात केली. 

तीन महिन्यांनंतर म्हणजे एप्रिलपासून शासनाने अनुदान संपूर्णपणे बंद केले. एकीकडे शासनाचे अनुदान बंद झाले असताना दूध संकलन करणाºया संघांनी दर वाढविण्यास सुरुवात केली. एक मेपासून दुधाचे दर वरचेवर वाढत आहेत. एक मे ते २१ जून या कालावधीत सरासरी चार ते सहा रुपयांनी दूध खरेदीदर वाढले आहेत. २१ जूननंतर दूध खरेदीदर प्रति लिटर २६ रुपयांपासून २८ रुपयांपर्यंत गेला आहे. एक जुलैपासून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण आहे दूध संकलनात झालेली मोठी घट तसेच तयार पावडरचा साठा कमी झाल्याने पावडरच्या दरातही झालेली वाढ. 

एकूणच देशाच्या विविध राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पावडरची मागणी वाढली, दूध संकलन घटले. राज्यात दूध संकलनात घट झाली असून पश्चिम महाराष्ट्रातच दरदिवशी १० लाख लिटर संकलन घटले आहे. एकट्या सोनाई दूध संघाचे पाच लाख लिटर दूध संकलन घटले असल्याचे सांगण्यात आले. अशाच पद्धतीने राज्यभरात १५ ते २० लाख लिटर दूध संकलन घटले आहे. 

पावडरचे दर २८० रुपयांपर्यंतजानेवारीपर्यंत दूध पावडर शिल्लक असल्याने दूध खरेदीदर वाढत नव्हता. मार्चनंतर दूध पावडरची मागणी वाढली व मागणीप्रमाणे दूध पावडर मिळेनाशी झाली. यामुळे पावडरचा किलोला १८० रुपये असलेला दर २८० रुपयांवर गेला आहे. आता पावडर तयार करण्यासाठी पुरेसे दूध मिळत नसल्याचे सांगण्यात आले. दूध पंढरीचा दर लिटरला २६ रुपये - सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचा (दूध पंढरी) एक मे रोजी गायीच्या दुधाचा खरेदीदर २३ रुपये लिटर इतका होता. एक मे रोजी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ २३ रुपयांचा दर शेतकºयांना देत होता. २१ मेपासून २४ रुपये, एक जूनपासून २५ रुपये व २१ जूनपासून गायीचे दूध २६ रुपयांनी खरेदी केले जात आहे.

मागील वर्षी या कालावधील आमच्याकडे २१ लाख लिटर दूध संकलन होत होते. यावर्षी ते १६ लाखांवर आले आहे. २१ जूनपासून गायीच्या दुधाला शेतकºयांना प्रति लिटर २६ रुपये ५० पैसे दर दिला जातो. एक जुलैपासून २७ रुपये दर करणार आहे.- दशरथ माने,अध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर 

जानेवारी महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात ८० लाख लिटर दूध संकलन होत होते. ते सध्या ७० लाखांवर आले आहे. आणखीन संकलन कमी होईल, असा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे दूध संकलनाला फटका बसला आहे. - प्रशांत मोहोड,प्रादेशिक दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी, पुणे 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाdroughtदुष्काळ