सनबर्न फेस्टिव्हलला पोलिसांचा रेड सिग्नल
By Admin | Updated: January 14, 2017 05:02 IST2017-01-14T05:02:16+5:302017-01-14T05:02:16+5:30
बंगळूर पाठोपाठ मुंबई पोलिसांनी सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सनबर्नला मुंबईत होणारा कार्यक्रमही

सनबर्न फेस्टिव्हलला पोलिसांचा रेड सिग्नल
मुंबई : बंगळूर पाठोपाठ मुंबई पोलिसांनी सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सनबर्नला मुंबईत होणारा कार्यक्रमही रद्द करावा लागणार आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनबर्नने शुक्रवारी मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला फ्रेंच ग्रॅमी पुरस्कार विजेता डीजे आणि संगीतकार डेव्हिड गेट्टा हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार होते. मात्र आवश्यक त्या परवानग्या न घेतल्यामुळे मुंबई महापालिकेने रेसकोर्सवरील कार्यक्रमास नकार दिला, शिवाय कार्यक्रमाचे तिकिटेही खरेदी न करण्याचे आवाहन केले.
त्यापाठोपाठ त्यांनी बीकेसी मैदानावर कार्यक्रम घेण्याचे ठरविले. मात्र, आवश्यक परवानग्या तसेच कायदेशिर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे त्यांना येथे कार्यक्रम घेता येणार नाही. अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. संबंधित सरकारी यंत्रणांकडून परवानग्या न घेतल्यामुळे सनबर्नने बंगळुरुमध्ये आयोजित केलेला कार्यक्रमही अडचणीत आला होता. (प्रतिनिधी)