शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

लाल परी थांबली ! मराठवाड्यात एसटी कर्मचा-यांच्या संपाला उत्फूर्त प्रतिसाद, प्रवाशांचे प्रचंड हाल तर खाजगी वाहतूक सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:09 AM

एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला मराठवड्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. विभागातील सर्वच बसस्थानकात बस सेवा बंद असल्याने दिवाळी निम्मित प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

ठळक मुद्दे बस फे-या रद्द झाल्याने शेकडो  प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबलेखाजगी वाहतूकदारांनी याचा फायदा घेत बस स्थानकाकडे मोर्चा वळवला आहे. 

औरंगाबाद :  एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला मराठवड्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. विभागातील सर्वच बसस्थानकात बस सेवा बंद असल्याने दिवाळी निम्मित प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बस फे-या रद्द झाल्याने शेकडो  प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबले असल्याने खाजगी वाहतूकदारांनी याचा फायदा घेत बस स्थानकाकडे मोर्चा वळवला आहे. 

कर्मचा-यांच्या संपामुळे दिवाळीसाठी गावी जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बस  कधी जाणार? अशी विचारणा करीत प्रवासी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गर्दी करीत आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रवासी, लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

काय आहेत मागण्या राज्यांच्या महामंडळातील कर्मचार्‍यांपेक्षा कमी पगारी महाराष्ट्र एस.टी.महामंडळातील कर्मचार्‍यांच्या आहेत. त्या धर्तीवर सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी तयार करून एस.टी.कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे ही प्रमुख मागणी असून खाजगी गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करावा, जाचक परिपत्रके रद्द करावेत, चालक कम वाहकांची संकल्पना त्वरीत रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना रूपये 500 भरून वर्षभर मोफत पास द्यावा. तसेच राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता वेळीच द्यावा या संघटनेच्या मागण्या आहेत. या संपास मान्यता प्राप्त एस.टी.कामगार संघटनेसह महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना आदींचा पाठिंबा आहे. 

परळी - परळीत बस स्थानकातून रात्री 12  पासून एकही गाडी न सुटल्याने शुकशुकाट. संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा एसटी कामगार संघटनेचे रमेश गित्ते यांनी केला आहे. मात्र, यामुळे अवैध प्रवासी वाहतूक तेजीत आहे. 

भोकर -भोकर आगारातील चालक वाहक कामगार मध्यरात्री पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे मंगळवारी सकाळ पासुन एकही गाडी आगारातून निघाली नाही. कामगार आपल्या मागण्याबाबत ठाम असून  कायम तोडगा निघाल्या शिवाय कामावर जाणार नाही असा पावित्रा घेतला आहे. शेजारील तेलंगणा राज्यातून आलेल्या एसटी बसलाही येथील आंदोलक कामगारांनी माघारी फिरवले आहे. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी होऊन खाजगी प्रवासी वाहनांचा वापर प्रवाशांना करावा लागत आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्धल आदोलक कर्मचाऱ्यांनी दिलगीर व्यक्त केली आहे. 

कंधार -आगारातील सुमारे 350 चालक,वाहक,यांत्रीकी आदी कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतल्याने आगारातुन बस बाहेर पडल्या नाहीत. या संपाने मात्र खाजगी वाहनाची च़ंगळ झाली. 200 पेक्षा अधिक खाजगी वाहनांना हा संप सुगीचा व पर्वणीचा ठरला.

परतूर -परतूर बस आगारात चालक वाहकांनी मुंडण करून केला शासनाचा निषेध.

पाटोदा -बस आगारावरात कर्मचा-यांनी संबळ वाजऊन केला सरकार आणि परिवहन मंत्र्यांचा निषेध केला. तब्बल 376 कर्मचा-यांनी संपात सहभागी होत प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.