विद्यापीठाकडून निधी घेवूनही विद्यार्थ्यांकडून वसूली

By Admin | Updated: May 8, 2014 22:24 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-08T22:24:24+5:30

महाविद्यालयांकडून पे ॲण्ड पार्कचे कंत्राट काढून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांकडून निधी परत घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Recovery from students by taking funds from university | विद्यापीठाकडून निधी घेवूनही विद्यार्थ्यांकडून वसूली

विद्यापीठाकडून निधी घेवूनही विद्यार्थ्यांकडून वसूली

पुणे: पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी निधी दिला जातो,मात्र तरीही महाविद्यालयांकडून पे ॲण्ड पार्कचे कंत्राट काढून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांकडून निधी परत घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थांकडून पार्किंगचे पैसे आकारले जातात. महाविद्यालयातर्फे पार्किंगचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार पार्किंगचे पैसे गोळा करण्यासाठी ज्या मुलांची नेमणूक करतो. ती मुले महविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींशी चांगल्या पध्दतीने वागत नाहीत. त्याचा प्रत्यय बी.जे.मेडीकल महाविद्यालयांना झालेल्या मारहाणीतून समोर आला आहे.
पुणे विद्यापीशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांना पार्किंगचे शेड उभारण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यात पुणे शहरातील काही महाविद्यालयांचा समावेश आहे.परंतु,या महाविद्यालयांतर्फे सध्या विद्यार्थांकडून पार्किंगचे पैसे आकारले जात आहेत.शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने काही दिवस विद्यार्थ्यांकडून पार्किंगचे पैसे घेतले नाही.परंतु,एका महिन्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांकडून पार्किंगच्या नावाखाली वसूली सुरू झाली.
-------------------------
पार्किंगच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादामुळे विद्यार्थ्याला मारहाण कारणे निंदनिय आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांना पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.ज्या महाविद्यालयांनी हा निधी घेतला आहे.त्यांनी विद्यार्थांकडून पार्किंगचे पैसे वसूल करणे अयोग्य आहे. तसेच इतरही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पार्किंगचे पैसे आकारू नये या दृष्टीने विद्यापीठातर्फे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
-डॉ.वासुदेव गाडे,कुलगुरू ,पुणे विद्यापीठ

Web Title: Recovery from students by taking funds from university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.