शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खर्च वसूल झालेले ६२ टोल बंद

By admin | Updated: March 17, 2015 01:46 IST

देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरींची घोषणा : यापुढे सिमेंटचेच महामार्गनवी दिल्ली : ज्या रस्त्याच्या बांधकामासाठी १०० कोटींपेक्षा कमी खर्च झाला आहे व ज्यांचा खर्च टोलमधून वसूल झाला आहे, असे देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती देतानाच महामार्गांची गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी यापुढे सिमेंटचेच रस्ते बांधण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली.सिमेंट रस्त्यांमुळे खर्च वाढणार नसून, किमान १२० रुपये प्रति बॅग या दराने सिमेंट मिळणार असल्याने रस्त्यांची किंमत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर गडकरी यांनी त्यांच्या विभागाने सुरू केलेल्या नवीन वेब पोर्टलची माहिती दिली. जागतिक पातळीवरील नवे तंत्र रस्ते निर्माणासाठी वापरण्यात येईल, असे सांगून रस्त्यांची गुणवत्ता व त्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी सिमेंट रस्त्यांचा निर्णय घेतला आहे. देशातील ३६ सिमेंट कंपन्यांचे १०३ प्लांट आहेत. तेथून सिमेंट घेतले जाईल. त्यामुळे वाहतूक खर्चाचा बोजा व पर्यायाने किंमत कमी होईल. या पोर्टलवर आलेल्या निविदांनुसार किमान दर १२० रुपये प्रतिबॅग असून, कमाल दर १५७ रुपये ठरला आहे. राज्य सरकारे, महापालिका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी हा दर कायम आहे. आपल्या विभागाने यासाठी प्रथम पुढाकार घेतल्याने पायाभूत योजनांसाठी सिमेंट वापरण्यात येणार असल्याने यापुढे ३० टक्क्यांपर्यंत प्रकल्पांची किंमत कमी होईल. (विशेष प्रतिनिधी)राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, पीपीपी मॉडेलनुसार १०० कोटींपेक्षा कमी खर्च आलेले टोलनाके बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांवर यापुढे ई-टोल पद्धतही सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना बँकेत पैसे भरल्यानंतर एक स्टिकर देण्यात येईल. हे स्टिकर वाहनावर लावल्यानंतर त्यांना टोलनाक्यांवर थांबण्याची व टोल भरण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.