पालघरमध्ये ‘नोटा’चा झाला विक्रमी वापर
By Admin | Updated: May 17, 2014 23:53 IST2014-05-17T23:53:29+5:302014-05-17T23:53:29+5:30
ठाणो जिल्ह्यातील ठाणो, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघातील 67 उमेदवारांना 37 लाख 58 हजार 3क्2 मतदारांनी मतदान केले.

पालघरमध्ये ‘नोटा’चा झाला विक्रमी वापर
>सुरेश लोखंडे - ठाणो
ठाणो जिल्ह्यातील ठाणो, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघातील 67 उमेदवारांना 37 लाख 58 हजार 3क्2 मतदारांनी मतदान केले. पण यापैकी 53 हजार 443 मतदारांनी या उमेदवारांना नाकारले आहे. यासाठी त्यांनी ‘नोटा’चे बटन दाबून सर्व उमेदवारांना नापसंती दर्शविली आहे.
या निवडणुकीपासून यंत्रवरील शेवटच्या म्हणजेच क्रमांक 16च्या बटनाद्वारे ही सुविधा नोटा या नावाने उपलब्ध करून दिली होती. नोटाचा वापर करणा:यांत सरकारी नोकरीतील 41 मतदारांचा समावेश आहे. शासकीय कामकाजात असल्यामुळे मतदान केंद्रांवर न जाता जिल्ह्यातील दोन हजार 939 या नोकरदार मतदारांनी पोस्टल बॅलेटव्दारे मतदानाचा हक्क बजावला. यापैकी दोन हजार 357 मतदारांनी उमेदवारांना पसंती दर्शविली तर 541 मते बाद ठरवली आहेत. ठाणो मतदारसंघातील 26 उमेदवारांना 13 हजार 174 मतदारांनी नापसंती दर्शविली आहे. याशिवाय 16 मते बाद झाली आहेत. कल्याणमधील 18 उमेदवारांना नऊ हजार 185 मतदारांनी नाकारले आहेत तर 164 मते बाद ठरली आहेत. या प्रमाणोच भिवंडीतील 13 उमेदवारांना नऊ हजार 311 मतदारांनी नकार दिलेला असून 2क्9 मते बाद ठरली आहेत. पालघर या मतदारसंघातील दहा उमेदवारांना सर्वाधिक 21 हजार 797 मतदारांनी धिक्कारले आहेत तर 152 मते बाद ठरले आहेत.