म्हसळ्यात विक्रमी पावसाची नोंद
By Admin | Updated: June 29, 2016 02:32 IST2016-06-29T02:32:37+5:302016-06-29T02:32:37+5:30
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी म्हसळा तालुक्यात आतापर्यंत ७०७ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली

म्हसळ्यात विक्रमी पावसाची नोंद
म्हसळा : गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी म्हसळा तालुक्यात आतापर्यंत ७०७ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली असून २७ जूनला दुपारी बारा वाजेपर्यंत ४९ मि.मी. पाऊस पडला असून सोमवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
म्हसळा शहरातील गटारांची अवस्था बिकट असून गटारांची उंची व रुंदी कमी असल्यामुळे थोड्या पावसातही गटारे तुडुंब भरून सर्व पाणी रस्त्यावर येते. यामुळे विद्यार्थी, नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. गटारांच्या देखभालीसाठी प्रचंड निधी येवूनही नगरपंचायतीने गटारे रु ंद के ले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढा प्रचंड पाऊस पडत असतानाही तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. तालुक्याची आपत्कालीन व्यवस्था चोख असून अधिकारी आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)
>जनजीवन विस्कळीत
रेवदंडा : पावसाचा जोर वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. भाजी, फुले, फळ विक्रे ते यांना चांगलाच फटका बसला आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी सुखावला.
>नागोठण्यात मुसळधार
नागोठणे : मंगळवारी पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंबा नदीसह नाले सुद्धा तुडुंब भरून वाहत असल्याने पावसाचा जोर रात्रभर असाच कायम राहिला, तर पुराची शक्यता नाकारता येत नाही.