चित्रपट सल्लागार समितीची पुनर्रचना
By Admin | Updated: February 25, 2016 00:30 IST2016-02-25T00:30:22+5:302016-02-25T00:30:22+5:30
उच्च दर्जाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांना करमणूक शुल्क सवलत प्रदान करण्याकरिता चित्रपटाचे परिनिरीक्षण करून शासनाला शिफारस आणि अहवाल

चित्रपट सल्लागार समितीची पुनर्रचना
पुणे : उच्च दर्जाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांना करमणूक शुल्क सवलत प्रदान करण्याकरिता चित्रपटाचे परिनिरीक्षण करून शासनाला शिफारस आणि अहवाल सादर करण्यासाठी शासनाच्या चित्रपट सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये अशासकीय व्यक्तींच्या पॅनलवर पुण्यातील लेखक प्रा. विश्वास वसेकर, आशिष कुलकर्णी यांच्यासह अभिनेत्री रेणुका शहाणे यांची वर्णी लागली आहे.
राज्य शासनाला महाराष्ट्र करमणूक शुल्क कलम ६ (३) अंतर्गत करमणुकीच्या साधनांना करमणूक शुल्क भरण्याच्या दायित्वातून सवलत देण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार उच्च दर्जाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांना करमणूक शुल्क प्रदान करण्यात येते. त्याप्रमाणे गतवर्षी २७ मार्चला चित्रपट सल्लागार समितीची पुर्नरचना करण्यात आली. या समितीवर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार प्रा. वसेकर (शैक्षणिक), आशीष कुलकर्णी (सामाजिक) आणि रेणुका शहाणे (सांस्कृतिक) यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)