संतोष पोळच्या घरात औषधांचा साठा अन् दागिन्यांच्या पावत्या

By Admin | Updated: August 22, 2016 05:24 IST2016-08-22T05:24:57+5:302016-08-22T05:24:57+5:30

सिरियल किलर संतोष पोळ याच्या धोममधील घर, फार्म हाऊस, पोल्ट्री फार्म व वाईतील घराची पोलिसांनी झडती घेतली.

Receipt of medicines and jewelery receipts in Santosh Pol's house | संतोष पोळच्या घरात औषधांचा साठा अन् दागिन्यांच्या पावत्या

संतोष पोळच्या घरात औषधांचा साठा अन् दागिन्यांच्या पावत्या


वाई/पसरणी : सिरियल किलर संतोष पोळ याच्या धोममधील घर, फार्म हाऊस, पोल्ट्री फार्म व वाईतील घराची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी औषधांचा साठा, आक्षेपार्ह कागदपत्रे, सिनेमा सिडीज्, काही दस्तऐवज, दागिने खरेदी केलेल्याच्या पावत्या आणि एक लोखंडी गज त्याच्या घरात सापडला.
पोलिसांनी संतोष आणि त्याची पत्नी सीमाला वेगवेगळ्या वाहनांतून वाईला आणले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कसला लवलेशही दिसत नव्हता. चार ठिकाणी पोलिसांनी झडती घेतली. संपूर्ण घराची झडती घेण्यास पोलिसांना सुमारे चार तास लागले. त्यानंतर पोलिसांनी संतोषला साताऱ्याला नेले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेची टीम व केईएम हॉस्पिटलची फॉरेन्सिक लॅबची टीम वाई येथे आली होती. या टीमने वाई पोलीस ठाण्यात येऊन तपासाचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Receipt of medicines and jewelery receipts in Santosh Pol's house