प्रियकराच्या पत्नीने केला भंडाफोड, बलात्काराला फुटली अशी वाचा

By Admin | Updated: February 10, 2017 03:59 IST2017-02-10T03:59:12+5:302017-02-10T03:59:12+5:30

एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लिल चित्रफित तयार करून तिच्यावर प्रियकर व त्याच्या मित्रांनी गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सामूहिक बलात्काराचा भंडाफोड पिडीतेच्या

Read the rumor of the beloved wife, the rape of the rape | प्रियकराच्या पत्नीने केला भंडाफोड, बलात्काराला फुटली अशी वाचा

प्रियकराच्या पत्नीने केला भंडाफोड, बलात्काराला फुटली अशी वाचा

वसई : एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लिल चित्रफित तयार करून तिच्यावर प्रियकर व त्याच्या मित्रांनी गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सामूहिक बलात्काराचा भंडाफोड पिडीतेच्या प्रियकराच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडित तरूणी सध्या १७ वर्षांची असून वसईच्या नामांकित महाविद्यालयात बारावीत शिकते. तीन वर्षापूर्वी प्रियकर योगेश सुतारने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. तेव्हा ती चौदा वर्षांची होती. यावेळी त्याने तिची अश्लिल छायाचित्रे काढली होती. ती इतरांना दाखविण्याची धमकी देऊन योगेश व त्याचे मित्र तिच्यावर गेली ३ वर्षे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करीत होते. भीतीमुळे या पिडीत तरुणीने याप्रक़रणाची कुठेही वाच्यता केली नव्हती. २८ जानेवारीला आरोपीच्या एका मित्राने तिला एव्हरशाईन येथे बोलावले आणि पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याची कुणकुण योगेशच्या पत्नीला लागताच तिने पिडितेला विश्वासात घेवून सारे जाणून घेतले व पोलीसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पिडीतेने तक्रार नोंदवताच पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा केलेले आहेत. एव्हरशाईन येथील ज्या इमारतीत सामूहिक बलात्काराची घटना घडली त्या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फूटेजही पोलिसांना मिळाले आहे. त्यात सर्व आरोपी दिसून आले आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करून तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 

Web Title: Read the rumor of the beloved wife, the rape of the rape