शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

11 वेळा हनुमान चालिसा पठण केलं! उद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर नवनीत राणांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:23 IST

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातीलउद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेनंतर, त्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्यांना पती रवी राणा यांच्यासोबत तुरुंगातही जावे लागले होते. आता त्यांनी संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना, महाराष्ट्राला संकटातून वाचवता यावे, यासाठी आपण 11 वेळा हनुमान चालिसा पठण केले, असे म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यसभा आणि विधान परिषदेत जर अशा पद्धतीने मतदान होत असेल तर, महाविकास अघाडीत शिवसेनेचे आमदार खूश नाहीत. त्यांनीच भाजपच्या उमेदवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करत विजयी केले. आम्ही गेल्या आडीच वर्षांपासून महाराष्ट्राल बुडताना बघत आहोत. महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर व्हायरला हवे. आमदार राज्याचे नुकसान होताना बघू शकत नाहीत आणि लवकरच हे संकट दूर करायला हवे. शिवसेनेतील अतर्गत मतभेदातूनच हे संकट निर्माण झाले आहे. एवढेच नाही, तर आपल्या कर्मानेच उद्धव ठाकरे सरकार पडेल, असेही त्या म्हणाल्या. 

राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला -राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यात मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड तसेच संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची 'मन की बात' बोलून दाखवली. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट 'अल्टिमेटम' वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र