आरबीआय उद्या घेणार लोकसवा बॅँकेचा आढावा
By Admin | Updated: June 23, 2014 22:40 IST2014-06-23T22:40:59+5:302014-06-23T22:40:59+5:30
रिझव्र्ह बँक (आरबीआय) येत्या बुधवारी (दि.25) लोकसेवा सहकारी बँकेच्या कजर्वसुलीचा व सद्य:स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष किरण सोनवणो यांनी सोमवारी दिली.

आरबीआय उद्या घेणार लोकसवा बॅँकेचा आढावा
>पुणो : रिझव्र्ह बँक (आरबीआय) येत्या बुधवारी (दि.25) लोकसेवा सहकारी बँकेच्या कजर्वसुलीचा व सद्य:स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष किरण सोनवणो यांनी सोमवारी दिली.
आर्थिक अनियमिततेमुळे लोकसेवा बँकेवर आरबीआयने र्निबध घातले असून, त्यास नुकताच एक महिना पूर्ण झाला. प्रशासकीय मंडळाने यादरम्यान केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात बँकेने सहा कोटी रुपयांची कजर्वसुली केली असून, त्यापैकी तीन कोटी रुपये अनुत्पादित खात्यातील (एनपीए) आहेत. तर, एनपीए खात्यातील एकूण थकीत कर्जाचे प्रमाण बारा कोटी रुपये आहे.
बँकेने लग्न, आरोग्य, शिक्षण या कारणांसाठी पैसे हवे असलेल्या अडचणीतील खातेदारांकडून (हार्डशिप) मागविलेले 35 अर्ज शनिवारी आरबीआयकडे पाठविले आहेत. आरबीआयकडून मंजुरी मिळाल्यानंतर या खातेदारांना पैसे
दिले जातील. (प्रतिनिधी)