कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:26 AM2017-10-13T04:26:22+5:302017-10-13T04:26:41+5:30

सुनेचा गर्भपात करण्यासाठी तिला कच्ची पपई खायला देणा-या ६ जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मुंबईला राहणाºया मोना पारेख यांचा अर्पणसोबत विवाह झाला.

The raw papaya feeding expensive, six people arrested for abortion | कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक

कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक

Next

वसई : सुनेचा गर्भपात करण्यासाठी तिला कच्ची पपई खायला देणा-या ६ जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मुंबईला राहणाºया मोना पारेख यांचा अर्पणसोबत विवाह झाला. लग्नानंतर तिचे सासरच्यांंशी खटके उडायला लागले. दरम्यान, मोना गर्भवती असल्याची बातमी त्यांना कळली. त्यांनी तिला कच्ची पपई खायला दिली. त्यामुळेच गर्भपात झाल्याची तक्रार मोनाने पोलिसांत केली. या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ३१३ अन्वये अर्पणसह सासू संगीता, सासरा रमेश, दीर केतन आणि आत्या रंजन यांना अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

Web Title: The raw papaya feeding expensive, six people arrested for abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.