शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:59 IST

Raver Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रक्षा खडसे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Raver Lok Sabha Result 2024:रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसे(Raksha Khadse) यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने श्रीराम पाटील(Shriram Patil) यांना उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, हाती आलेल्या कलांनुसार, रक्षा खडसे सुमारे २७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर श्रीराम पाटील यांना १८ हजार मते मिळाल्याची माहिती मिळाली आहे. 

रावेर मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता प्रक्रियेला वेग आला आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये परतणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन आता निकालाचा दिवस आला, तरी एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश रखडल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काही टप्प्यांतील मतमोजणी पूर्ण झाली असून, या कलांनुसार, रक्षा खडसे यांना २७ हजार ९२० मते मिळाली असून, ०९ हजार ३९७ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, श्रीराम पाटील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीराम पाटील यांना १८ हजार ५२३ मते मिळाली आहेत. अद्याप मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागतो, याकडे भाजपा आणि महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना ०६ लाख ५५ हजार ३८६ मते मिळाली होती. एकूण मतांपैकी ६० टक्के मते रक्षा खडसे यांना मिळाली होती. तर काँग्रेसचे उल्हास पाटील पराभूत झाले होते. त्यांना ०३ लाख १९ हजार ५०३ मते मिळाली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४raver-pcरावेरraksha khadseरक्षा खडसेshriram patilश्रीराम पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस