अंजली दमानियांविरुद्ध रावेर न्यायालयाचे अटक वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 19:09 IST2018-04-13T19:09:18+5:302018-04-13T19:09:18+5:30
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याचा अंजली दमानिया यांच्यावर आरोप आहे.

अंजली दमानियांविरुद्ध रावेर न्यायालयाचे अटक वॉरंट जारी
रावेर : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याचा अंजली दमानिया यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणाचा खटला रावेर कोर्टात आहे. दरम्यान, याप्रकरणी अंजली दमानिया वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
यापूर्वीदेखील अंजली दमानियांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. मात्र अंजली दमानिया यांच्या प्रकृती अस्वास्थासह त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्या न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याची बाजू मांडल्यानंतर त्यांचे अटक वॉरंट थांबवण्यात आले होते.
रावेर न्यायालयात भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयात जून २०१७ मध्ये दावा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीत दमानिया सातत्याने गैरहजर राहिल्याने रावेर न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट काढले आहे.