चेंबूरमध्ये रावणाचा मृत्यू,रामलीला कार्यक्रमानंतर आला हार्ट अॅटॅक

By Admin | Updated: October 6, 2016 16:05 IST2016-10-06T16:05:41+5:302016-10-06T16:05:41+5:30

रामलीला मध्ये रावणाची भुमीका साकारणारया एका कलाकाराचा हार्ट अ‍ॅटेकने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री चेंबूरमध्ये घडली.

Ravana's death in Chembur, Ramlea's heart attack after heart attack | चेंबूरमध्ये रावणाचा मृत्यू,रामलीला कार्यक्रमानंतर आला हार्ट अॅटॅक

चेंबूरमध्ये रावणाचा मृत्यू,रामलीला कार्यक्रमानंतर आला हार्ट अॅटॅक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ -  रामलीला मध्ये रावणाची भुमीका साकारणारया एका कलाकाराचा हार्ट अ‍ॅटेकने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री चेंबूरच्या गांधी मैदान येथे घडली. गणेश प्रसाद मिश्रा (६०) असे या कलाकाराचे नाव असून ते मध्य प्रदेश येथील राहणारे होते.    
 
चेंबूरच्या गांधी मैदानात गेल्या  २३ वर्षांपासून रामलीला सादरी केली जात आहे. त्यानुसार यावर्षी देखील याठिकाणी रामलीलाचे प्रयोग चालूच आहेत. दरम्यान बुधवारी रात्री प्रयोग संपल्यानंतर मिश्रा बाहेर उतरले असतात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या सहकारयांनी त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात नेले. मात्र याठिकाणी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Ravana's death in Chembur, Ramlea's heart attack after heart attack