शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: रत्नागिरीत खेड-दापोली तालुक्यांच्या सीमेवर सापडला किल्ला, अपरिचित इतिहास समोर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 20:00 IST

Ramgad Fort in Ratnagiri: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर एक किल्ला असल्याचे समोर आले आहे. हा किल्ला पालगडच्या पूर्वेस समुद्र सपाटीपासून सुमारे ३९० मीटर उंचीवर स्थित आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणाला समृद्ध असा इतिहासही लाभला आहे. अनेक ऐतिहासिक गड,कोट, किल्ले कोकणात इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर एक किल्ला असल्याचे समोर आले आहे. या किल्ल्याचं नाव रामगड असून, दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डॉक्टर सचिन जोशी यांनी या किल्ल्याचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. हा किल्ला पालगडच्या पूर्वेस समुद्र सपाटीपासून सुमारे ३९० मीटर उंचीवर स्थित आहे. जवळच असलेल्या पालगडचा हा जोड किल्ला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या किल्ल्याचे सॅटेलाइट फोटो काढण्यात आले असून, त्यामधून तिथे काही बांधकामाचे अवशेष दिसून आले आहेत. आता किल्ल्याबाबत काय नवी ऐतिहासिक माहिती समोर येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कालौघात या किल्ल्यावरील बांधकामांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. किल्ल्यावर काही थडगी आणि काही भांड्यांचे अवशेष सापडले आहेत.

नव्याने प्रकाशात आलेला रामगड हा किल्ला पालगडचा जोडकिल्ला आहे. मात्र तो जोडकिल्ला असल्याने त्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. त्यातील एक किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर दुसरा किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यात सापडला आहे.  मात्र नव्याने आढळून आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रामगड या किल्ल्याचं बांधकाम कधी झालं. कुणी केलं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या किल्ल्याचा इतिहास शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र