शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
4
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
5
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
6
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
7
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
8
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
9
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
10
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
11
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
12
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
13
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
14
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
15
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
16
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
17
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
18
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
19
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
20
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!

स्वस्त धान्य दुकानदार वितरण करणार बंद : राज्यात १ सप्टेंबरपासून आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:32 IST

कोरोना महामारीत रेशनिंग दुकानदार अविरतपणे सेवा देत आहेत. परंतु शासनाला याची जाणीव नाही

ठळक मुद्देन्यायालयाचा आदर राखून शासनाने निर्णय घेणे होते अपेक्षित

पिंपरी : रेशनिंग दुकानदारांची आरोग्य तपासणी करून विमा संरक्षण, तसेच सुरक्षा साधने प्रदान करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. मात्र शासनाकडून अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे रेशनिंग दुकानदार १ सप्टेंबरपासून धान्य वितरण करणार आहेत. ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशन या संघटनेतर्फे धान्य वितरण बंद आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच वित्त विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदन दिले आहे. ई- पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्यास स्थगितीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे.  त्याला चार आठवडे झाले. मात्र त्यावर शासनाकडून अद्याप निर्णय झाला नाही. कोरोना महामारीत रेशनिंग दुकानदार अविरतपणे सेवा देत आहेत. परंतु शासनाला याची जाणीव नाही. न्यायालयाचा आदर राखून शासनाने निर्णय घेणे अपेक्षित होते. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत धान्य वाटप केलेल्या वितरणाचे कमिशन देखील काही जिल्ह्यांमध्ये  दिले गेले नाही, तसेच केशरी कार्डधारकांना राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या धान्याचे कमिशन ८० रुपये अजूनपर्यंत रेशनिंग दुकानदारांना मिळाले नाही. ते कमिशन त्वरित रेशनिंग दुकानदारांना अदा करावे. रेशनिंग दुकानदार कोरोना बाधित होत आहेत, मृत्यूमुखी पडत आहेत. त्यांचा संसार उघड्यावर येत आहे. त्यामुळे शासनाने रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस