शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

डिजिटल सातबारा व्यवहारात स्वीकारण्याचे प्रमाण अद्यापही नगण्यच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 7:31 PM

राज्यात आजही अनेक सरकारी कामकाजात, बँकांमध्ये, कर्ज प्रकरणे अथवा अन्य कामांसाठी, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा आवश्यक असतो...

ठळक मुद्देबँका, सरकारी कार्यालयांमध्ये प्रिंट सातबाऱ्याची मागणीराज्यात केवळ २१ बँकांनी केला डिजिटल सातबाऱ्यासाठी महसूल विभागाशी करार 

सुषमा नेहरकर- शिंदे-पुणे : राज्य शासनाला येत्या काही काळात दैनंदिन व्यवहारातील हस्तलिखित सातबाऱ्याचा वापर बंद करायचा आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी व्यवहारात डिजिटल सातबार वापर केला पाहिजे, परंतु सध्या डिजिटल सातबारा व्यवहारात स्वीकारण्याचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचे समोर आले आहे.  आजही बहुतेक सर्व बँका, सरकारी कार्यालयांमध्ये प्रिंट सातबाऱ्याची मागणी केली जाते. राज्यात आता पर्यंत केवळ २१ बँकांनी डिजिटल सातबाऱ्यासाठी महसूल विभागाशी करार केले आहेत.       राज्यात आजही अनेक सरकारी कामकाजात, बँकांमध्ये, कर्ज प्रकरणे अथवा अन्य कामांसाठी, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा आवश्यक असतो.  परंतु एक सातबारा उतारा काढण्यासाठी लोकांना तलाठी कार्यालय अथवा तहसिलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अनेक वेळा सातबारा वेळेत न मिळाल्याने चांगल्या योजनांच्या लाभा पासून वंचित राहावे लागते. सर्वसामान्य व्यक्ती व शेतकऱ्यांचे महसूल कार्यालयात हेलपाट्याशिवाय काम व्हावे यासाठीच राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या चार वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीसह सात-बारा, फेरफार, खाते उतारा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांचे काम सोपे झाले आहे. यामध्ये महसूल विभाग एक पाऊल पुढे टाकत आता शेतकऱ्याला सातबाऱ्यांची प्रिंट देखील काढावी लागू नये यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी महसूल विभागाने आता थेट डिजिटल स्वाक्षरीत साताबाऱ्यांची लिंक उपलब्ध करून दिली असून, संबंधित कार्यालयांने या लिंकवर जाऊन थेट आपल्याला पाहिजे तो सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकतो. परंतु राज्यात केवळ २१ बँकांनी यासाठी करार केला असून, गेल्या दीड-दोन वर्षांत चाडे चार लाख सातबारे डाऊनलोड केले आहे. तर काही सरकारी कामांमध्ये अल्प प्रमाणात आता डिजिटल सातबाऱ्यांचा वापर होऊ लागला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची संख्या आणि सहकारी, शासकीय बँका आणि खाजगी बँकांची संख्या लक्षात घेता केवळ २१बँकाच सध्या ऑनलाईन डिजिटल सातबारा वापर करत आहेत.            राज्यात आजही पीक कर्जाबरोबरच इतर शेती विषयक कर्ज घेण्यासाठी सात- बारा, फेरफार खाते उतारा ही कागदपत्रे घेऊन बँकांकडे जावे लागत होते. बँकांमधील काही अधिकारी केवळ कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून कर्ज प्रकरण टाळण्याचे प्रयत्न करत असतात. यामुळेच जास्तीत जास्त बँकांनी डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्यांसाठी महसूल विभागाशी करार केल्यानंतर संबंधित लिंक उपलब्ध करून दिली जाईल. -----बँका, सरकारी कार्यालयांने करार करण्यासाठी पुढे यावेभविष्यात हस्तलिखित सातबारा व्यवहारातून टप्प्या- टप्प्यांनी कमी होत जाणार आहे. सध्या दररोज तब्बल १० ते १५ हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारे डाऊनलोड केले जातात. राज्यात आता पर्यंत केवळ २१ बँकांनी यासाठी शासनाशी करार केले आहेत. काही सरकारी कार्यालयांने देखील हे करार केले असून, केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या सर्व डीबीटी योजनांच्या लाभासाठी डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्याची लिंकचा वापर केला जातो. परंतु हे प्रमाण खूपच कमी असून, जास्तीत जास्त बँका व सरकारी कार्यालयांने यासाठी पुढे येऊन करार करावेत.- रामदास जगताप,  उपजिल्हाधिकारी, तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारdigitalडिजिटलbankबँक