मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच
By Admin | Updated: October 18, 2014 02:27 IST2014-10-18T02:27:15+5:302014-10-18T02:27:15+5:30
भाजपाचे राज्यात सरकार आले तर मुख्यमंत्रिपदावरून या पक्षात रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच
भाजपात हेवेदावे : देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडे यांचा विरोध
मुंबई : भाजपाचे राज्यात सरकार आले तर मुख्यमंत्रिपदावरून या पक्षात रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्री व्हावे अशी जनभावना असल्याचे मत व्यक्त केले आहे तर मुख्यमंत्रिपदाकरिता कुणी फ्रंटरनर नाही, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संसदीय मंडळ व विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार घेतील, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या आघाडीवर असले तरी एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांनाही मुख्यमंत्री होण्यात रस आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी सर्वप्रथम तावडे यांनी करून त्यांचेही नाव चर्चेत आणले. आपण मुख्यमंत्री व्हावे अशी जनभावना असल्याची प्रतिक्रिया पंकजा यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री होणार का, असा सवाल केल्यावर त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया कशी देणार, असा प्रतिसवाल करीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे ठामपणो स्पष्ट केलेले नाही.
विनोद तावडे यांनी टि¦ट करून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुणी फ्रंटरनर नाही. पक्षाचे संसदीय मंडळ व विधिमंडळ भाजपा पक्षाचे सदस्य असलेले आमदार मुख्यमंत्री कोण होणार त्याचा निर्णय घेतील, असे म्हटले आहे.
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त झाल्यामुळे पक्षात सध्या चैतन्य असले, तरी दुसरीकडे संभाव्य राजकीय आराखडय़ावर चर्चाही सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत अथवा बहुमताच्या जवळपास जागा मिळाल्या तरच सरकार स्थापन करावयाचे; अन्यथा 1क्क्पेक्षा कमी जागा मिळाल्या तर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी असल्याचे पक्षाच्या सूत्रंनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्रिपदाचे दावेदार व त्यांचे उणो-अधिक
एकनाथ खडसे : ओबीसी समाजातील नेते असून सर्वात
ज्येष्ठ आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्याचा अडसर.
देवेंद्र फडणवीस : अभ्यासू व स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व.
मात्र जातीचा अडसर
विनोद तावडे : मराठा समाजातील नेते असून अनेकविध पक्षांशी सौहार्दाचे संबंध आहेत. मात्र स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा अडसर.
सुधीर मुनगंटीवार : ओबीसी समाजातील नेते असून
नक्षलग्रस्त भागातून विजयी होतात. मात्र कामगिरी प्रभावशून्य.
पंकजा मुंडे : गोपीनाथ मुंडे यांची कन्या असून ओबीसी
असणो. मात्र अननुभवी असल्याचा अडसर.