विक्रोळीतील बलात्कार; पीडितेची वैद्यकीय तपासणी

By Admin | Updated: January 16, 2015 06:11 IST2015-01-16T06:11:12+5:302015-01-16T06:11:12+5:30

लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत १७वर्षीय मुलीवर गेल्या तीन वर्षांपासून नराधम आरोपी संजीव मुनीश चौहान (३१) याने बलात्कार केला नसल्याचा दावा केला आहे.

Rape of Vikhroli; Medical examination of the victim | विक्रोळीतील बलात्कार; पीडितेची वैद्यकीय तपासणी

विक्रोळीतील बलात्कार; पीडितेची वैद्यकीय तपासणी

मुंबई : लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत १७वर्षीय मुलीवर गेल्या तीन वर्षांपासून नराधम आरोपी संजीव मुनीश चौहान (३१) याने बलात्कार केला नसल्याचा दावा केला आहे. तसेच आज मुलीचा जबाब नोंदविण्यात आला असून, पुराव्यांसाठी दोघांंचीही वैद्यकीय तपासणी केली.
विक्रोळी पूर्वेकडील वाल्मीकी नगर परिसरात राहणाऱ्या १७वर्षीय तक्रारदार मुलीच्या एकटेपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेत चौहान तिच्यावर गेली तीन वर्षे लैंगिक अत्याचार करीत होता. मुलीच्या भावाला जीवे ठार मारण्याच्या धमकीने ही मुलगी हा अत्याचार निमुटपणे सहन करीत होती. मंगळवारी रात्री चव्हाणने या मुलीवर बलात्कार केला. याची माहिती मुलीच्या आईला समजताच तिने मुलीला विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.(प्रतिनिधी)

Web Title: Rape of Vikhroli; Medical examination of the victim