बलात्कारी खुन्याला अटक

By Admin | Updated: August 26, 2016 02:32 IST2016-08-26T02:32:03+5:302016-08-26T02:32:03+5:30

बलात्कार आणि खुनाचा आरोप असलेल्या संदेश वरठा याला घोलवड पोलिसांनी पोरबंदरातून अटक केली.

Rape victim murdered | बलात्कारी खुन्याला अटक

बलात्कारी खुन्याला अटक


डहाणू/बोर्डी : बलात्कार आणि खुनाचा आरोप असलेल्या संदेश वरठा याला घोलवड पोलिसांनी पोरबंदरातून अटक केली. तो डहाणूतील बोर्डीनजीकच्या जांबुगावचा रहिवासी आहे. विवाहित आदिवासी महिलेला निर्जनस्थळी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला व पीडित महिलेच्या बहिणीला धमकावून तिचा खून केला होता.
अस्वाली येथील एका पस्तीस वर्षीय आदिवासी महिलेने याबाबतची फिर्याद घोलवड पोलिसात नोंदवली. ६ आॅगस्ट रोजी, दुपारी तीनच्या सुमारास आरोपी तिच्या घरी गेला. तिला शेतजमिनी संदर्भातील वाद मिटवू असे सांगून त्याने तिला दुचाकीवरून मित्राच्या घरी नेले. ७ आॅगस्टच्या सायंकाळी अंधार पडल्यानंतर जांबुगावतील मूऱ्हाडपाडा येथील शासकीय नर्सरीत नेऊन रात्री बारा वाजेपर्यंत आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेची परिसरात वाच्यता झाल्यानंतर १६ आॅगस्ट रोजी तो जांबुगावत राहणाऱ्या फिर्यादीच्या बहिणीच्या घरी गेला. व बहिणीला समज देण्याचा दम देऊन मला दंडुक्याने मारहाण केली. त्यामुळे चार दिवसांनी तिचा मृत्यू झाला अशी तक्रार पीडित महिलेने घोलवड पोलिसात नोंदवली.
दरम्यान आरोपी संदेश रमेश वरठा हा गुजरात राज्यातील पोरबंदर येथे मासेमारी बोटीवर खलाशाचे काम करण्यासाठी गेला होता. पोलीसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. डहाणू न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: Rape victim murdered