मूकबधिर तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: November 16, 2016 20:26 IST2016-11-16T20:26:29+5:302016-11-16T20:26:29+5:30

शिरुर तालुक्यातील खोकरमोहा येथे एका मूकबधिर तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ती गर्भवती असल्याचेही समोर आले आहे.

Rape of the Mookabirdh Rape Girl | मूकबधिर तरुणीवर बलात्कार

मूकबधिर तरुणीवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १६ - शिरुर तालुक्यातील खोकरमोहा येथे एका मूकबधिर तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ती गर्भवती असल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे कुटुंबीय शेतात कामानिमित्त गेल्याचा फायदा घेऊन पाच महिन्यांपूर्वी गावातीलच हनुमंत विठोबा बांगर याने तिच्यावर घरात घुसून बळजबरीने अत्याचार केला. यामध्ये ती गर्भवती राहिली. कुटुंबियांनी तिची सखोल चौकशी केली तेव्हा हा सारा प्रकार पुढे आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन शिरुर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून तपास सहायक निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत

Web Title: Rape of the Mookabirdh Rape Girl